विजय शिंदे
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर शहरातील भाग्यश्री निवासस्थानी गुरुवार (३१) रोजी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व नागरिकांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दूरध्वनी व सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
यावेळी निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील म्हणाले की दिवाळी सणानिमित्त मायेचा आपुलकीचा गोडवा जपावा या उद्देशाने दरवर्षी आपण या कार्यक्रमाचे आयोजन करतो. याही वर्षी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व सौ भाग्यश्री पाटील यांच्या संकल्पनेतून एकत्रित येऊन फराळाचा आस्वाद घ्यावा दिवाळी सणानिमित्त आपल्या लोकांसोबत आनंदाचा वेळ घालवता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तालुक्यातील सर्व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.