विजय शिंदे
राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील २०२३ ते २०२४ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळं राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामंपचांयतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत.
इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली ग्रामपंचायत वर आजपासून प्रशासकाचे नियुक्ती करण्यात आली आहे. १४ मार्चपासून शेटफळ हवेली ग्रामपंचायतवर विस्तार अधिकारी एस एस मारकड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.