विजय शिंदे
विधानसभेच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची तारीख संपून गेली. तरीही महायुतीत जागावाटपासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड आणि पुरंदर विधानसभेच्या जागांसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बंडखोरीचे निशाण फडकावण्यात आले आहे.
जिल्ह्यातील दौंड, बारामती, पुरंदर, या ठिकाणी अजित पवार यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आग्रह धरला जात होता. पण भाजप आणि शिंदे गटाकडून याठिकाणी अधिकृत उमेदवार दिल्यामुळे या उमेदवारांविरोधात थेट एबी फॉर्म देण्यात आल्यामुळे आपण ही जागा सोडणार नसल्याचे एकप्रकारे संकेतही अजित पवारांकडून देण्यात आले आहेत.
दौंडची जागेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. अजित पवारांनी गेल्या काही वर्षात दौंड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ कामही केलं. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी, अशी मागणी अजित पवार गटाच्या वैशाली नागावडे यांनी केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या 4 तारखेच्या वाटाघाटीत जे होईल ते होईल,पण आम्ही या जागेसाठी ठाम आहोत, भाजप नेते कायम महायुती धर्म निभाव, असे म्हणत अशतात, पण अजित पवारांच्या माध्यामातूनच आतापर्यत दौंड तालुक्याचा विकास झालाय, असंही वैशाली नागावडे यांनी म्हटलं आहे.