इंदापुरात तिरंगी लढत; भरणे ,पाटील, माने मैदानात.!!

विजय शिंदे 

इंदापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी दहा उमेदवारांनी माघार घेतली आहे. २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील, महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे व अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने या तिघांमध्ये तिरंगी लढत होईल हे स्पष्ट झाले आहे.

प्रवीण माने यांचा अपक्ष अर्ज राहिल्याने इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत २९ वर्षानंतर प्रथमच तगडी अशी तिरंगी लढत होणार आहे. माने यांनी गेली वीस वर्ष एकत्रित माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत काम केल्याने अनेक पदे भूषवली आहेत. त्यामुळे दशरथ माने व उमेदवार प्रवीण माने यांना मानणारा मोठा वर्ग राष्ट्रवादीत आहे त्यामुळे प्रवीण माने यांची उमेदवारी इंदापुरात निर्णायक ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here