इंदापुरात परिवर्तन विकास आघाडीच्या मानेंचा पाटील भरणे यांना धक्का

विजय शिंदे 

विधानसभा निवडणुकीपूर्वी इंदापुरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडत आहे. इंदापुरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयूरसिह पाटील यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे इंदापुरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी प्रवीण मानेंना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. पाटील यांच्यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सचिन देवकर यांनी देखील प्रवीण मानेच्या परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दिला.त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांनाही मोठा फटका बसला आहे,तर हर्षवर्धन पाटील यांना बावड्यात नेहमीच विरोध करणारे विजय गायकवाड यांनीही परिवर्तन विकास आघाडीचे प्रवीण माने यांना पाठिंबा दिला आहे.

इंदापुरमध्ये हळूहळू प्रवीण मानेंच्या परिवर्तन विकास आघाडीचा जनाधार वाढत आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील व दत्तात्रय भरणे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

कोण आहेत मयूरसिंह पाटील…?

तत्कालीन पणन व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू मयूर सिंह पाटील यांच्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, सभापती, दूधगंगा दूध उत्पादक संघ वाहतूक संघ अशा अनेक विविध संस्थांच्या जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या होत्या, हर्षवर्धन पाटील यांचा विधानसभेला पराभव झाला त्यावेळी मयूरसिंह पाटील यांच्यावर अनेक कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला होता.

यावेळी तत्कालीन सर्व पदाधिकाऱ्यांना नारळ देऊन नवीन कार्यकर्त्यांची फळी तयार करा असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला परंतु त्यात काय दुरुस्ती झाली नाही त्यामुळे कार्यकर्तेही नाराज झाले.

मधु मामा सारखा भाऊ असावा..

२०१४ साली विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर नारायणदास रामदास हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या सभेत उपस्थित गाव पातळीवरील कार्यकर्त्यांनी पाटील कुटुंबियातील इतर पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती, यामध्ये सर्वात जास्त टीका ही मयूरसिंह पाटील यांच्यावर करण्यात आली होती,यावेळी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष व ज्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला त्या दत्तात्रय भरणे यांचे बंधू मधुकर भरणे हे ज्या पद्धतीने आमदार भरणे यांच्या अनुपस्थितीत काम करतात जनतेचे प्रश्न सोडवतात तसे जर तुमच्या कुटुंबातील पदाधिकाऱ्यांनी सोडवले असते तर आज ही  पराभवाची वेळ आली नसती अशी टीका कार्यकर्त्यांनी सर्वांसमोर केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here