विजय शिंदे
शरद पवारांचा पक्ष फुटल्यानंतर त्यांची जी अवस्था झाली होती, तीच आज माझी झाली आहे, मला एकट पाडण्याचा प्रयत्न होतोय ज्यांना आजपर्यंत पद दिली, विश्वासाने संस्था चालवायला दिल्या. ज्यांना मान सन्मान दिला ज्यांचा आर्थिक फायदा करून दिला तीच माणसं आज मला सोडून जात आहेत परंतु जनता अशा लोकांना धडा शिकवेल इंदापूर विधानसभेची निवडणूक जनतेच्या हातात असून जनता माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि.५) व्यक्त केला.ते भाटनिमगाव येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
भाटनिमगाव येथे सभेसाठी उपस्थित राहताच गावातील युवकांनी बाईक रॅली काढत हलगीच्या निनादात फटाक्यांची आतषबाजी करत पाटील यांची गावातून मिरवणूक काढली. यावेळी ग्रामदैवत शेख फरीद बाबा यांच्या दर्ग्याला चादर चढवत पाटील यांनी आशीर्वाद घेतले.
आज दिनांक (५) रोजी हर्षवर्धन पाटील यांचे सख्खे चुलत भाऊ मयूरसिंह पाटील यांनी अपक्ष बंडखोर उमेदवार प्रवीण माने यांच्या परिवर्तन महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला याचा चांगलाच समाचार हर्षवर्धन पाटील यांना घेतला. रोज नवनवीन प्रवेशाच्या बातम्या येत आहेत आणखी काहीजण जातील आता माझ्याकडे देण्यासारखे काही राहिले नाही त्यामुळे समोर असलेल्या दोन्ही धनाड्य उमेदवारांकडे मी मोठे केलेले कार्यकर्ते सोडून जात आहेत, परंतु जनता माझ्यामागे असून मी कोणाचे वाईट केले नाही परंतु मला मुद्दामून टार्गेट केले जात असल्याचे पाटील म्हणाले. शरद पवारांचा पक्ष फुटल्यानंतर त्यांची जी अवस्था झाली होती, तीच आज माझी झाली आहे,
पुढे बोलताना ते म्हणाले, शरद पवार यांनी ५० वर्षात अनेक नेते मोठे तयार केले, वेळ आल्यानंतर ही ठराविक माणसे शरद पवारांना सोडून गेली. त्यांना एकटे पाडले. आज तीच अवस्था तालुक्यात माझी झाली आहे. पण जरी काही माणसं सोडून गेली असली तरी, जनता माझ्याबरोबर आहे तोपर्यंत हर्षवर्धन पाटील डगमगणार नाही, असा आत्मविश्वास हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी बोलून दाखवला.
यावेळी त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावरही टीका केली या गावातील किती युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला.? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर ठेकेदारांकडून तालुक्यातील महिलांना वाटण्यासाठी साड्या घेतल्याचा आरोप ही त्यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच अजित खबाले यांनी केले,यावेळी अशोकराव घोगरे, महारुद्र पाटील, विलासराव वाघमोडे, नितीन शिंदे, अमोल भिसे, राजकुमार जाधव, मोहन खबाले, भागवत शिंदे, विष्णू मोरे ,संदेश शिंदे, दिनेश शिंदे,बंडू जाधव, अदित्य शिंदे, नानासाहेब भोसले, ह भ प संतोष मगर,संतोष गवळी, लतीफ पठाण,शकील शेख,दत्तात्रय खबाले, सचिन कांबळे,राजू ढोणे, दिलीप पवार,माऊली खबाले, चंद्रकांत चव्हाण, महादेव डोंगरे,अनिल पवार, गोपाळ खबाले, जमीर पठाण ,विजय खबाले, सचिन अलगुडे, प्रशांत बागल, अमोल देवकर, महिपत कदम, प्रताप गाडे, शिवाजी पवार, गणेश तावडे, रोहन मगर,अमीर सय्यद, संतोष पवार, प्रसाद गवळी, संजय कदम उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नागनाथ खबाले यांनी व्यक्त केले.