विजय शिंदे
इंदापूर विधानसभेसाठी तुम्ही मायबाप जनतेने परिवर्तन करून काम करण्याची संधी दिल्यास पाच वर्ष तुमचा सेवक म्हणून काम करेल अशी ग्वाही परिवर्तन विकास आघाडीचे इंदापूरचे उमेदवार प्रवीण माने यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे प्रचार सभेच्या निमित्ताने(दिनांक ६) प्रवीण माने बोलत होते.
यावेळी बोलताना प्रवीण माने म्हणाले इंदापूर तालुक्यात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम सोनाली उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण केले, इंदापूर तालुक्यात मी जनतेचा उमेदवार म्हणून तुमच्या आशीर्वादाने निवडणुकीच्या आखाड्यात उतरलो आहे.तुमचा सेवक म्हणून काम करण्याची संधी दिल्यास तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेला रोजगाराचा प्रश्न सोडवण्यास पहिले प्राधान्य दिले जाईल.त्याचबरोबर इंदापूर तालुक्यात असणारा शेतीचा पाणी प्रश्न, विजेच्या समस्या, ऊस पिका संदर्भात येणाऱ्या अडचणी दरा संदर्भात येणाऱ्या अडचणी, सोडविण्यासाठी भविष्यात काम करणार असल्याचे माने म्हणाले.
यावेळी परिवर्तन विकास आघाडीचे प्रचार प्रमुख बाबासाहेब चवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील व तरंगवाडी परिसरातील कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.