विजय शिंदे
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा मुंबईच्या बीकेसीमध्ये पार पडली. या सभेमध्ये महाविकास आघाडीने महाराष्ट्राला पाच गॅरंटी दिल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांसाठी महालक्ष्मी योजना तसंच तरुणांसाठीही दरमहा पैसे देणार असल्याची घोषणा केली आहे.
महाविकास आघाडीच्या 5 गॅरंटी कोणत्या?
शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्ज माफ
आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार
मुली-महिलांसाठी बससेवा मोफत
युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चार महिन्यांना चार हजार रुपये
महिलांसाठी महालक्ष्मी योजना, दर महिना 3 हजार रुपये.