विजय शिंदे
तुम्ही सर्वांनी काम करण्याची संधी दिली तर इंदापूर तालुक्यातील युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल त्यासाठी २० नोव्हेंबर रोजी किटली ध्यानात असू द्या असे मत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण दशरथ माने यांनी व्यक्त केले. ते इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली येथे(दिनांक ७)प्रचार सभेच्या निमित्ताने बोलत होते.
यावेळी बोलताना प्रवीण माने म्हणाले मी सुद्धा एक उद्योजक असून इंदापूर तालुक्यातील हजारो युवकांना बेरोजगाराची संधी सोनाई च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. लोणी येथील एमआयडीसी येथे नवीन उद्योग येण्यासाठी लागणारी सर्व तरतूद करून उद्योजकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांना आवाहन करू.
इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न ,तसेच शेती पिकांना बाजार भाव मिळवून देण्यासाठी आपण विधानसभेत प्रश्न मांडू.यावेळी शेटफळ हवेली परिसरातील नागरिक मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.