विजय शिंदे
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना भटक्या विमुक्त जमाती संघटना, महाराष्ट्र राज्य यांचा पाठिंबा असल्याचे पत्र संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार,उपराकार मा.लक्ष्मण माने यांनी दिले आहे.
सत्तेची पदे दिलेली सहकारी साथ सोडत असताना भाच्या विमुक्त जमाती संघटनेने दिलेला पाठिंबा हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी दिलासा ठरणार आहे. गेली 50 वर्ष राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या सोबत मा. लक्ष्मण माने काम करीत आहेत. आमचे कार्यकर्ते हे भटक्या विमुक्त समाजाच्या वस्त्यामध्ये जाऊन आपला निवडणूक प्रचार करणार आहेत. आमच्या उपेक्षित समाजातील लोक विधानसभा निवडणूक 2024 साठी राज्यभर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे काम करीत आहेत. इंदापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (भाऊ) यांच्या नावासमोरील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हांसमोरील बटन दाबून विजयी करणेसाठी, आमचा सर्व समाज व आमचे कार्यकर्ते कामास लागले आहेत, असे या पत्रात उपराकार लक्षण माने व सरचिटणीस नारायण जावलीकर यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, भटक्या विमुक्त जमाती संघटनेने सक्रिय पाठिंबा जाहीर केलेबद्दल उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी उपराकार लक्षण माने व सरचिटणीस नारायण जावळेकर यांचे आभार व्यक्त केले.
____________________________