विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील काही गावात प्रचाराला वेगळे वळण लागत आहे, शहा येथील महादेव मंदिरासमोर लागलेला परिवर्तन विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांचा बॅनर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फाडला आहे, यातच आता इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावात माजी मंत्री व महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचाही बॅनर आज्ञातांनी फाडल्याची घटना समोर आली आहे.तर आजोती या गावातील पाटील यांचा बॅनर सह फेम गायब केल्याचे पुढे आले आहे.
या दोन्ही घटनेचा इंदापूर तालुक्यातील मतदारांकडून निषेध व्यक्त करण्यात येत असून, कोणत्याही गावात असे प्रकार घडू नयेत याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
यावेळी बोलताना इंदापूर अर्बन बँकेचे संचालक स्वप्निल सावंत म्हणाले विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने अशा घटना घडत आहेत, सोबतची अनेक नेते फोडूनही अपयश येताना दिसत असल्याने हर्षवर्धन पाटील यांचे बदलते वातावरण पाहून अशा घटना घडणार आहेत.