अपक्ष उमेदवार प्रवीण माने हे महायुती चे उमेदवार दत्तात्रय भरणे यांची “बी” टीम.!! हर्षवर्धन पाटील यांचा आरोप.

विजय शिंदे 

अपक्ष उमेदवार प्रवीण माने हे महायुती मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांची “बी” टीम असून विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून मत विभाजनासाठी माने यांना महायुती मधील मोठ्या नेत्याने उभे केले असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.

इंदापूर येथे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संदिपान कडवळे व इंदापूर शहरातील ॲड असिफ बागवान यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला, यावेळी पाटील बोलत होते.

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले आज इंदापूर तालुक्यात पळसदेव भागात असताना एका मतदाराने मला बाजूला बोलावून घेतले व ही गोष्ट सांगितली. अपक्ष उमेदवार प्रवीण माने व राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे एकच असून तुमची मतं विभाजन करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्याने त्यांना उभे केले असल्याचे सांगितले. निवडणुकीनंतर अपक्ष उमेदवार प्रवीण माने एका मोठ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावाही पाटील यांनी केला.

त्यामुळे माने व भरणे एकच असून मतदान काळजीपूर्वक करा असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित कार्यकर्ते व मतदारांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here