विजय शिंदे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान जिल्हा सरचिटनीस संदिपान कडवळे यांनी माजी सहकार व संसदिय कार्य मंत्री तथा इंदापूर विधानसभा मतदार संघातील शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह इंदापूर येथे पक्ष प्रवेश केला.
इंदापूर शहरातील संत सावता माळी कार्यालय येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे मेदवार हर्षवर्धन पाटील यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी आरपीआयचे संदिपान कडवळे यांचा पक्षप्रवेश घेण्यात आला.त्याचबरोबर आरपीआयच्या इतर कार्यकर्त्यांचाही पक्ष प्रवेश घेण्यात आला.या
बरोबर इंदापूर शहरातील मुस्लिम समाजाचे असंख्य किर्यकर्ते व बावडा भागातील नाभिक समाजाच्या युवकांनी शरद पवार पक्षात प्रवेश केला.यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की,राज्यात व पश्चिम महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीची हवा आहे.त्यामुळे त्यामुळे संदिपान कडवळे यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे.माझ्या विरोधात दोन उमेदवार उभे आहेत.ते कोण आहेत,ज्यांना पवार साहेबांनी सर्व काही दीले आहे.तरीही ते माझ्या विरोधात उभे आहेत.
आणि ज्यांना पवार साहेबांनी काहीच दीलेले नाही ते सर्व आपल्यासोबत आहेत.यांना सर्वकाही देवुनसुद्धा आज ही माणस पवार साहेबांच्या विरोधात काम करत आहेत.आपला स्वार्थ साधणारा वर्ग सध्या राज्यात व इंदापूर तालुक्यात तयार झाला असल्याचे पाटील म्हणाले.
जोपर्यंत या महाराष्ट्रातील सामान्य जनता शरद पवार साहेबांच्या मागे आहे,तोपर्यंत ह्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही.इंदापूर तालुक्यात जर मागासवर्गीय विभागातुन १०० कोटी निधी आला तर त्यातुन २०टक्के रक्कम बाजुला जाते.म्हणजे याचा अर्थ असा आहे की,१०० कोटीचे काम असेल तर ते फक्त ८० कोटीतच केले जाते.आणी ८० कोटीचे काम असेल व त्याला अ.ब.
क.ड असेल तर ते ५० कोटीवर येते.आणि मग समाजासाठी मिळालेला १०० कोटी निधी ५०कोटीवर येतो.म्हणजे राहीलेल्या ५० कोटीचे पाप कुठे फेडणार असा माझा सवाल असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
माझ्या विरोधात उभे असलेले दोन उमेदवार हे एकच आहेत.दुसरा उमेदवार हा बी टीम आहे.
कुठल्यातरी एका महायुतीच्या पक्षाने हा उमेदवार पुरस्कृत केलेला आहे.त्यामुळे लक्षात ठेवा राजकारण कशा पद्धतीने गूप्त डाव आखले जातात.याबाबत आपल्या सर्वांना गांभिर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.काही नेते असे म्हणाले की आमचे सरकार येवु द्या धनगर समाजाचे आरक्षण पहिल्या कॅबीनेटमध्ये मंजुर करतो.परंतु दहा वर्षात अनेक कॅबीनेट मिटींग झाल्या परंतु धनगर आरक्षण अद्याप दीलेले नाही.
———————————————————————