विजय शिंदे
हडपसर येथील नगर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदाचा सुनिता मधुकर कोकणे यांनी राजीनामा दिला आहे.
यावेळी सुनिता कोकणे यांनी पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री गाजरे यांच्या वर्तणुकीमुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. हडपसर येथील नगर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी सुनीता मधुकर कोकणे या काम पाहत होत्या त्यांनी १२ नोव्हेंबर रोजी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.