विजय शिंदे
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
इंदापूर विधानसभेसाठी निवडणुक तिरंगी होणार असून कोपरा सभा, घोंगडी बैठका, होम टू होम प्रचार यासह आता मोठ्या सभांना ही सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष्याचे उमेदवार व धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांची आज (१३) शेळगाव येथे जाहीर सभा होणार आहे.
तर हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता खासदार डॉ अमोल कोल्हे यांची निमगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
धनगर समाजाचे नेते म्हणून राज्यात ओळख असलेले उत्तमराव जानकर व खासदार अमोल कोल्हे इंदापूर तालुक्यात येऊन काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. तर यावेळी ओबीसी समाजातील अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.