विजय शिंदे
इंदापूर विधानसभा निवडणुकीच्या वातावरण चांगलेच रंगू लागले आहे, ग्रामीण भागात घोंगडी बैठका ,होम टू होम प्रचार करत सर्वपक्षीय कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र आहे.परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण माने यांच्या प्रचारार्थ इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे घर टू घर प्रचार पत्रिका वाटत प्रवीण माने यांचे कार्यकर्ते मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
यापूर्वी परिवर्तन विकास आघाडीचे मार्गदर्शक दशरथ माने तसेच माने कुटुंबियातील इतरही सदस्यांनी घरोघरी जाऊन प्रवीण माने यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.प्रवीण माने यांना तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत असून इंदापूर तालुक्यात परिवर्तन होणार असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.
यावेळी महादेव खबाले, शरद गवळी, गौरव पवार, निजाम पठाण,सुरज पाचकवडे, विशाल मगर, महेश साळुंखे व इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.