विजय शिंदे
माजी मंत्री व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांची सभा गाजवली ती शेळगाव गावातील एका कार्यकर्त्याने अतुल शिंगाडे असे त्या कार्यकर्त्याचे नाव.
शेळगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचार सभेचे आयोजन केले होते या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी धनगर समाजाचे नेते माळशिरस तालुक्याचे उमेदवार उत्तम जानकर हे आले होते.
यावेळी बोलताना शिंगाडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटावर सडकून टीका केली, गावात एक गुलाबी गॅंग तयार असून शेळगाव गावातील गटार सोडत नाहीत, अंगणवाडी सोडत नाहीत, गावातील संडास बांधकाम सोडत नाहीत, गावात झाकन टाकायचे असतील तरीही गुलाबी गॅंग गावात दोन-चार ठेकेदार झालेत सगळीकडे ही गुलाबी गॅंग आहे असे म्हणत त्यांनी विकास कामे निकृष्ट झाल्याचा आरोप केला.
यावेळी शिंगाडे म्हणाले हर्षवर्धन पाटलाच्या सभेला जाऊ नका म्हणून मतदारांना दमदाटी करत आहेत मलाही म्हणाले तुझं बघून घेईन अरे माझ काय बघून घ्याल माझा काय रंग बदलणार आहे का.?
यावेळी शिंगाडे यांनी नुकताच पक्ष सोडून गेलेले कर्मयोगी चे संचालक राहुल जाधव यांच्यावरही टीका शिंगाडे म्हणाले माझा मित्र पक्ष सोडून गेला त्याला भाऊ नी दहा वर्ष कारखान्याचे संचालक केले, वडील पाच वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य तरीपण म्हणतोय माझ्यावर अन्याय झाला भाऊ त्याच्यासारखा अन्याय आमच्यावरही कधीतरी करा पाच वर्षासाठी.
आता भाऊंना सोडून गेला आहे त्याला माझ्या शुभेच्छा, आता छत्रपती चे संचालक करून त्याला चेअरमन करावं असा उपरोधिक टोलाही लगावला.
यावेळी अतुल शिंगाडे म्हणाले ही विधानसभा निवडणूक शेळगाव गावातील जनतेने हातात घेतली असून ती कुणा पुढार्याच्या हातात आता राहिली नाही, त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना जास्तीत जास्त मताने मताधिक्य देण्याचे काम आम्ही करू.