विजय शिंदे
गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला विधानसभा निवडणुकीची धामधूम अखेर संपली आहे. आज 288 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रातील विविध पक्षाच्या उमेदवारांचे भवितव्य हे मतपेटीमध्ये बंद झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी यंदा राज्यभरात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 58.22 टक्के मतदान झाले. 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. तत्पुर्वी ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या एक्झिट पोल्सचे (Exit Polls) निकाल समोर येत आहेत. यामधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबद्दल संकेत दिसून येत आहेत. (Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024) अशातच खासदारांपासून ते केंद्रीय मंत्री पदापर्यंत पुणे शहराने अनेक पदे मिळवली आहे. त्यामुळे महत्त्वाच्या या जिल्ह्यामध्ये कोणत्या पक्षाचं वर्चस्व दिसत आहे ते जाणून घेऊयात.
२१ पैकी आत्ता कोणत्या पक्षाचे किती आमदार?
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – १०
भाजप – ८
काँग्रेस – ३
पुण्यात महायुती की महाविकास आघाडी, कोणाला किती जागा?
पुणे शहरातील ८ मतदारसंघापैकी ४ जागा महाविकास आघाडीला मिळतील तर ४ या महायुतीला मिळतील अशी शक्यता आहे. तर जिल्ह्यातील एकूण २१ मतदारसंघापैकी बोलायचं झाल्यास, ११ जागा या महाविकास आघाडीला जाण्याची शक्यता आहे. तर १० जागा या महायुतीला जाण्याची शक्यता आहे.
कोणत्या मतदारसंघात कोणते पक्ष जिंकण्याची शक्यता
195 – जुन्नर – महाविकास
196 – आंबेगाव – महाविकास
197 – खेड आळंदी – महाविकास
198 – शिरुर – महायुती
199 – दौंड – महाविकास
200 – इंदापूर – महाविकास
201 – बारामती -महायुती
202 – पुरंदर – महाविकास
203 – भोर – महाविकास
204 – मावळ – महायुती
205 – चिंचवड -महायुती
206 – पिंपरी -महायुती
207 – भोसरी – महायुती
208 – वडगाव शेरी -महाविकास आघाडी
209 – शिवाजीनगर – महायुती
210 – कोथरुड – महायुती
211 – खडकवासला – महायुती
212 – पार्वती -महायुती
213 – हडपसर -महाविकास आघाडी
214 – पुणे कॅन्टोन्मेंट -महाविकास आघाडी
215 – कसबा पेठ – महाविकास आघाडी
(सौजन्य एबीपी माझा)