अजित पवार भाकरी फिरवणार.? वळसे पाटलांचा पत्ता कट.? इंदापूरचे दत्तात्रय भरणे होणार कॅबिनेट मंत्री.

विजय शिंदे 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयानंतर आता राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण.? होणार, याबाबत अंतिम निर्णय घ्यायचा आहे. मात्र, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे.

महायुती सरकारमध्ये अजित पवारांच्या वाट्याला ९ कॅबिनेट मंत्रिपदं आली होती. त्यात आणखी दोनची भर पडून अजित पवारांना ११ मंत्रीपदं मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांचे एकून ४१ आमदार निवडून आले आहेत. त्यात सर्व विद्यमान मंत्री विजयी झाले आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा संधी मिळाली अशी त्यांची अपेक्षा आहे. असं असलं तरी मंत्रीमंडळात नवे चेहरे देण्याचा विचार अजित पवार करत आहेत. त्यामुळे काही वरिष्ठ मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मावळत्या मंत्रिमंडळात दिलीप वळसे पाटील हे मंत्री होते. त्यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी होती. त्यांनी नव्या मंत्रिमंडळात वगळण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या ऐवजी इंदापूर मतदार संघातून विजयी झालेले दत्तात्रय भरणे यांना संधी मिळण्याची चर्चा आहे. दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे जवळचे समजले जातात. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. राज्यातील ओबीसी चेहरा असलेले तसेच इंदापूर मतदारसघातून तिसऱ्यांदा  विजयी झालेले दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली जाईल असं बोललं जात आहे.

वळसे पाटील यांच्या प्रमाणे संजय बनसोडे हे पण मंत्रिमंडळात क्रीडामंत्री होते. त्यांनाही डच्चू दिली जाईल असं बोललं जात आहे. त्यांच्या ऐवजी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले राजकुमार बडोले यांना संधी दिली जाईल. बडोले यांनी या आधी ही फडणवीस सरकामध्ये मंत्रीपद सांभाळलं आहे. त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here