आमदार दत्तात्रय भरणे यांनी नाकारले पोलीस संरक्षण; म्हणाले इंदापूर तालुका माझे कुटुंब.!!

विजय शिंदे 

इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पोलीस संरक्षण नाकारले असून इंदापूरची जनता माझ्यासाठी कुटुंब आहे कुटुंबामध्ये वावरताना कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नुकतीच राज्यात विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये इंदापूर विधानसभा मतदार संघातून आमदार दत्तात्रय भरणे यांनी विजयाची हॅट्रिक करत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. जनतेच्या सहज संपर्कात राहणारे आमदार दत्तात्रय भरणे इंदापूरचे तिसऱ्यांदा आमदार झाले.

प्रोटोकॉल नुसार पुणे ग्रामीण अधीक्षक यांच्याकडून दोन शस्त्रधारी पोलीस कर्मचारी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासाठी नियुक्त करण्यात आले होते परंतु मला कोणत्याही सुरक्षेतेची गरज नसल्याची माहिती आमदार भरणे यांनी दिले असून पोलीस संरक्षण नाकारले आहे.

आमदार दत्तात्रय भरणे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असतानाही साधे राहणीमानाने परिचित होते, आताही महायुती सरकारमध्ये त्यांची कॅबिनेट किंवा राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांना मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here