विजय शिंदे
इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर शहरात खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे सिने अभिनेते संकर्षण कराडे यांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
इंदापूर शहर व परिसरात सामाजिक व शैक्षणिक कामात शहा कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे. इंदापूर शहरात व परिसरात भरतशेठ शहा व शहा कुटुंब यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भरतशेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विजेता महिलांना आकर्षक भेटवस्तू व पारितोषिके देण्यात येणार आहेत.
होम मिनिस्टर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.