राज्यातील शेतकरी, कष्टकरी, तरुणांच्या हिताचे निर्णय होतील, हीच अपेक्षा. त्यांना उज्वल महाराष्ट्र घडवण्याची पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..

विजय शिंदे 

माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे अभिनंदन केले असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. फेसबुक पोस्ट करत माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी तीनही नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले हर्षवर्धन पाटील..

आज मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच मा.एकनाथजी शिंदे व मा.अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या हातून राज्यातील जनतेची सेवा घडेल, आपले राज्य बलशाही बनेल, या सदिच्छा व्यक्त करतो.

आपल्या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, तरुणांच्या हिताचे निर्णय होतील, हीच अपेक्षा. त्यांना उज्वल महाराष्ट्र घडवण्याची पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here