विजय शिंदे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालय येथे प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.या वेळी श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विजय शिंदे व उपाध्यक्ष अनिल पवार यांनी पुष्पहार अर्पण करून डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी, गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यांना संविधानाचे जनक म्हटले जाते. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. दरवर्षी 6 डिसेंबर हा बाबासाहेबांचा पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.