विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील शहा येथे तालुका कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत मका पिकाची शेतकऱ्यांसाठी शेती शाळा घेण्यात आली. या शेती शाळेमध्ये मका पीक BBF साहाय्याने पेरणी पद्धत विषयी मार्गदर्शन केले. मका बीज प्रक्रिया विषयी कृषी सेवक फुलारी एस.पी. यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच कृषी पर्यवेक्षक यादव यांनी मका पिकाचे लागवडीपासून काढणीपर्यंत करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजना विषयी मार्गदर्शन केले,यावेळी मंडळ कृषी अधिकारी इंदापूर कदम साहेब यांनी कृषी विभागाच्या विविध योजना विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास माजी उपसरपंच दिलीप पाटील, अतुल पाटील, दिलीप कडवळे,धनाजी देवकाते,लहू निकम नितीन इजगुडे, सदाशिव देवकाते, दत्ता नगरे, दादा माने, अशोक भोई, बाबा गंगावणे ,हनुमंत निकम, महावीर इजगुडे, रविराज निकम ,सदाशिव देवकाते, गणेश भोई, तसेच कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी एस.एस.कदम, कृषी पर्यवेक्षक श्री यादव बी. आर. व कृषी सेवक एस.पी. फुलारी त्यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी शहा व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.