विजय शिंदे
भांडगाव ता. इंदापूर येथील पोपट शिंदे यांचे चिरंजीव सुनील शिंदे यांचे नदीमध्ये अपघाती दुःखद निधन झाले आहे. यामुळे त्यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला. या घटनेमुळे घरातील कर्ता माणूस गेल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुनील शिंदे यांना दोन मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न देखील या घटनेमुळे पुढे आला. या अपघाताची माहिती मिळताच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तत्काळ त्यांच्या घरी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी या कुटूंबाला धीर दिला. तसेच झालेल्या घटनेवर दुःख व्यक्त केले.
तसेच सुनील शिंदे यांना दोन लहान मुलं असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांना झाली. त्यांनी लगेच या मुलांच्या बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी घेतली. शिक्षणासाठी त्यांना काहीही कमी पडणार नाही, याची जबाबदारी माझी, असे सांगितले.
अशा प्रकारचे दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये, मात्र नियतीच्या मनात काय असतं हे कोणी सांगू शकत नाही. या कुटूंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळेल, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. याबाबत त्यांनी लगेच सूचना दिल्या. यामुळे या लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मिटणार आहे.