विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी मध्ये ईव्हीएम च्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करत डीजेच्या दणदणाटात प्रतिकात्मक ईव्हीएमची घोड्यावरून मिरवणूक काढत ईव्हीएम वापराला समर्थन देण्यात आले. यामुळे आगामी काळात ईव्हीएम चा मुद्दा इंदापूर तालुक्यातही जोर धरणार असल्याचे दिसत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम वरील मतदानाला विरोध करत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती व त्यानुरूप चाचणी मतदान घेण्याचे नियोजन केले होते. मात्र या प्रशासनाने विरोध केला. त्यानंतर महाविकास आघाडी कडून हा मुद्दा राज्याचा संपूर्ण देशभर उचलण्यात आला यामुळे मारकडवाडीची चाचणी मतदान प्रक्रिया चांगलाच प्रसिद्धी झोतात आला.
याच पार्श्वभूमीवर आता इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे ईव्हीएम च्या समर्थनार्थ गावाने एकत्रित येत चक्क डीजेच्या दणदणाटात प्रतिकात्मक ईव्हीएमची घोड्यावरून मिरवणूक काढली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डाॅ.शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली.