विजय शिंदे
आगामी काळात इंदापूर तालुक्यात होणाऱ्या सर्व निवडणुका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली लढवल्या जातील असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष अँड तेजशिंह पाटील यांनी व्यक्त केले.
इंदापूर अर्बन बँकेच्या चेअरमन पदी सत्यशील पाटील यांची निवड झाली यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना ॲड पाटील म्हणाले देशाचे नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, खा सुप्रिया सुळे , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली आगामी काळात इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते काम करतील.
यावेळी माजी मंत्री राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते ॲड राहुल मखरे, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, माजी सभापती विलासराव वाघमोडे, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, उदयसिंह पाटील, शिर्के दादा, कृष्णाजी ताटे, अमोल भिसे, सागर मिसाळ,महेंद्र रेडके, छगन भोंगळे, पराग जाधव, संग्रामसिंह निंबाळकर, शेखर पाटील, संदिपान कडवळे व अर्बन बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार बँकेचे संचालक स्वप्निल सावंत यांनी व्यक्त केले.
अर्बन बँकेच्या चेअरमन पदी सत्यशील पाटील..
सत्यशील पाटील हे इंदापूर अर्बन बँकेचे विद्यमान व्हा चेअरमन होते, बँकेचे तत्कालीन चेअरमन देवराज जाधव यांनी राजीनामा दिल्याने चेअरमन पद रिक्त झाले होते, या पदावर सत्यशील पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
येत्या दहा ते पंधरा दिवसात व्हा चेअरमन पदाची निवड करण्यात येणार आहे, ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला चेअरमन पदाची संधी दिल्याने व्हा चेअरमन पदासाठी शहरातील संचालकाला संधी मिळेल अशी चर्चा आहे.