विजय शिंदे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा रविवारी नागपुरात पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात ४२ मंत्री झाले आहेत. मात्र एक पद अद्याप रिकामे आहे. मात्र आता या एका पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. ती जागा वन डाऊनला जो प्लेअर येतो ना त्या प्लेअरसाठी ठेवलेली असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटलं.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशानाच्या आधीच महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी मंत्रिमंडळात अनेक जेष्ठ नेत्यांना बाजूला करत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या ही ४१ झाली आहे. त्यामुळे शेवटचे मंत्रीपद कोणासाठी रिक्त ठेवण्यात आलं आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. याच बाबत बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलत असताना अमोल मिटकरी यांना मंत्रिमंडळात एक मंत्रिपद खाली ठेवण्यात आलं आहे, ते नेमकं कोणासाठी आहे? जयंत पाटलांसाठी आहे की कोणासाठी आहे? असा पश्न विचारण्यात आला. यावर बोलताना आता योग्य निर्णय डिसेंबरच्या शेवटपर्यंत होणार असल्याचे मिटकरी म्हणाले.
“मागेही एक मंत्रिपद त्यांच्यासाठीच रिकामं ठेवलं होतं. मात्र त्यांनी त्यावेळेस फार विचार केला. नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळालं. त्यांना असं वाटलं की आपल्याला तिथे जाण्याची गरज नाही. पण आता अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते जे बोललेत ना योग्य व्यक्ती, योग्य वेळ, योग्य निर्णय घेतील. त्यामुळे तुम्ही बघा आता. वन डाऊनला जो प्लेअर येतो ना त्या प्लेअरसाठी ठेवलेली आहे,” असं अमोल मिटकरी म्हणाले.
“मला जेवढी माहिती आहे, ते लवकरच नक्की येतील. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. योग्य वेळ झालेली आहे. आता योग्य निर्णय डिसेंबरच्या शेवटपर्यंत होणार. एका जागेच्या मागील तेच कारण आहे योग्य व्यक्ती, योग्य निर्णय, योग्य वेळ त्यासाठीच एक जागा खाली आहे,” असंही मिटकरींनी म्हटलं.
सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार.?
लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आठ खासदार व दहा आमदारासह महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास सुप्रिया सुळे केंद्रात व जयंत पाटील राज्यात मंत्री होतील अशी चर्चा सुरू आहे.