विजय शिंदे
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आटोपल्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागून राहिलेले खातेवाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला कोणती खाती मिळणार, याविषयी प्रचंड तर्कवितर्क लढवले जात आहेत.
पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या खात्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या वाट्याला जुनीच खाती येण्याची शक्यता आहे.
अर्थ व नियोजन, महिला व बालकल्याण, कृषी, सहकार, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व बंदरे, मदत पुनर्वसन, अन्न नगरी पुरवठा व अन्न औषध प्रशासन ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यात राज्य उत्पादन शुल्क हे खाते नव्याने राष्ट्रवादी ला मिळेल, असे सांगितले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क हा विभाग अजित पवार स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
अजित पवारांच्या कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार?
सहकार- मकरंद पाटील
अर्थ व नियोजन- अजित पवार
महिला व बालकल्याण- आदिती तटकरे
कृषी- दत्तामामा भरणे
वैद्यकीय शिक्षण- हसन मुश्रीफ
अन्न व नागरी पुरवठा- धनंजय मुंडे