विजय शिंदे
महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या वतीने नामदार दत्तात्रय भरणे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
२२ डिसेंबर रोजी रविवारी दुपारी तीन वाजता इंदापूर येथील वाघ पॅलेस येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे व शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी दिले.
ना दत्तात्रय भरणे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत, त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री पदाची संधी मिळाली आहे.