इंदापूर मध्ये सकल मराठा समाज बांधव आक्रमक; बीड आणि परभणीतील घटनेचे पडसाद.

विजय शिंदे 

बीड आणि परभणीतील घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असताना पुण्याच्या इंदापूर मध्ये देखील सकल मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.गुरुवारी जय भवानी जय शिवाजी अशी जोरदार घोषणाबाजी करत या शेकडो तरुनांनी थेट इंदापूर तहसिल कार्यालय गाठत आपल्या मागणीचे लेखी निवेदन तहसलीदार बनसोडे यांना दिले आहे.

 

परभणी आणि बीड मधील घटना अत्यंत वेदणादायी आणि क्रुर आहेत. बीड मधील मस्साजोग येथील कर्तव्यदक्ष सरपंच आणि मराठा चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते संतोष देशमुख यांचे दिवसाढवळ्या अपहरण करुन खून करण्यात आला.ही घटना निंदनीय असून या खून प्रकरणातील मुख्य आरोपी,सुत्रधार त्यांचे सहकारी यांना तात्काळ अटक करण्यात यावी.

तर याच प्रकरणी राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांवर देखील विविध आरोप केले जात असल्याने धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा तर सरकारने याची सखोल चौकशी करावी अशी मागणी मराठा तरुणांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here