पळसदेव येथे सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्रोश मोर्चा; बीड, परभणी घटनेचा निषेध.

विजय शिंदे 

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अनेक दिवस झाले मात्र अजूनही या प्रकरणातील काही आरोपींना अटक झालेली नाहीये. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. आज देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी तसेच परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर व सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाकची न्यायालयीन चौकशी करून कायदेशीर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी सरपंच अंकुश जाधव, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक भूषण काळे, माजी उपसरपंच मेघराज पाटील, माजी सरपंच अजिनाथ पवार , सामजिक कार्यकर्ते अमोलभाऊ मोरे,ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल काळे,महेन्द्रभाऊ काळे शिवसेना अध्यक्ष सुरज काळे, सामाजिक कार्यकर्ते आंबा भिसे , अतुल तावरे, तुषार चव्हाण माजी सदस्य संजय शेलार , देवीदास बांडे, अक्षय भोसले , वैभव भोसले,अजय बनसुडे,राजेन्द्र कुचेकर , सतिष मोरे , आण्णा येडे , नाना येडे , राघव हागारे उपस्थित होते.

यावेळी सरपंच संतोष देशमुखला न्याय मिळालाच पाहिजे – खुन्याना अटक झालीच पाहीजे अशी घोषणाबाजी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here