विजय शिंदे
शहा गावचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य युवा उद्योजक दिलीप पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला क्रीडा साहित्य भेट देण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत निंबाळकर, बलभीम गंगावणे, लहू निकम, पत्रकार संतोष निकम, दादा भुई, दत्तात्रय नगरे, दिलीप नगरे, शरद भोई, गणेश भोई, शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर, मोरे सर, खंदारे सर, मोमीन सर, शिंदे मॅडम, मोमीन मॅडम व पालक विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बलभीम गंगावणे व लहू निकम यांनी मनोगत व्यक्त करताना दिलीप पाटील यांना शुभेच्छा दिल्या. दिलीप पाटील यांचे शाळेविषयी असणारी तळमळ, गावाविषयी असणारे आपुलकी यावेळी गंगावणे यांनी सांगितली.
यावेळी सत्काराला उत्तर देताना दिलीप पाटील म्हणाले शंभू महादेवाच्या आशीर्वादाने सामाजिक काम करण्याची प्रेरणा मिळते, वाढदिवसाच्या अतिरिक्त खर्च टाळून माझ्या गावातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य उपलब्ध झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद जगण्याची प्रेरणा देतो. यापुढेही अनावश्यक खर्च टाळून शाळेला मदत केली जाईल. शहा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानासोबतच क्रीडा व स्पर्धात्मक यशस्वी बनवण्यासाठी प्रयत्न करत असतात याचे आम्हाला कौतुक वाटते.
यावेळी दिलीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला क्रीडा साहित्य भेट म्हणून देण्यात आले.