विजय शिंदे
येत्या तीन ते चार महिन्याच्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, जसा महायुतीने महाविजय विधानसभेत मिळवला, तसाच महाविजय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मिळवायचा आहे, त्यासाठी तयारीला लागावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेतून केलंय. साईनगरी शिर्डीत भाजपच्या अधिवेशनामध्ये फडणवीस बोलत होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, चुकीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण समाजातील घटकांसाठी सुरू केलेल्या घटना शेवटपर्यंत सुरू राहणार आहेत. संघटनेला सरकारसोबत समर्थन करावं लागेल, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
भारतीय जनता पक्षाची संस्कृती आपण सर्वांनी लक्षात ठेवावं असं आवाहन फडणवीसांनी केलंय. येत्या काळात भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याकरत एक पारदर्शी चालणार सरकार आणि त्यामागे हिमालयासारखी उभी असणारी संघटना अशी प्रतिमा करायची आहे.