विजय शिंदे
शहर स्तरावर घेण्यात आलेल्या अभिवाचन स्पर्धेत हिंदवी प्रसाद शिंदे या विद्यार्थ्यांनीने द्वितीय क्रमांक पटकावला. शिशु विहार संस्थेच्या संचालिका सुनिता देव यांच्या माध्यमातून अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.याप्रसंगी त्यांनी सांगितले की हिंदवी शिंदे हीने या स्पर्धेत अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केले.
बाई इचरजबाई फिरोदिया प्रशालेत इयत्ता तिसरीत शिकणारी हिंदवी वकृत्व स्पर्धा, वाचन स्पर्धा, भाषण स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन नेहमीच उत्कृष्ट सादरीकरण करत असते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे तसेच स्वाती देशमुख यांच्या हस्ते हिंदवीस प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.हिंदवीस तिची आई भाग्यश्री शिंदे,गौरव मोरे ,ललित वाकचौरे , कांतीलाल खुरंगे,यांचे मार्गदर्शन लाभले.हिंदवी शिंदे ही स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांची ती कन्या आहे.