विजय शिंदे
इंदापूर पंचायत समिती येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त महापुरुषांना अभिवादन करण्यात आले, यावेळी गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त डॉ करुणा नंदराज चंदनशिवे यांचे व्याख्यान संपन्न झाले, यावेळी बोलताना डॉ करुणा चंदनशिवे म्हणाल्या की आई ही जगातील सर्वात मोठा गुरु आणि योद्धा असते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासून शौर्य कथांनी प्रेरित केले होते.अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती तलवार, ढाल देत युद्ध कौशल्य शिकण्यास प्रवृत्त करून न्यायनिवाड्याची कामे, नेतृत्व कौशल्य आणि एक मुत्सद्दी राजकारणी असे गुण दिले होते, स्वराज्य स्थापनेचे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊ साहेबांकडून मिळाले होते आणि ते त्यांनी देखील सत्यात उतरविले, अनंत काळापासून जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा नारीशक्तीने आपला अवतार घेतला आहे आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ आहेत.
यावेळी बोलताना ड्रॉ चंदनशिवे म्हणाल्या स्वामी विवेकानंद यांनी आपल्या विचारांमुळे स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली. भारत हा तरुणांचा देश असून या तरुणांना स्वामी विवेकानंद यांचे विचार योग्य दिशा देतील, स्वामी विवेकानंद हे अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. भारत सरकारने स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून जाहीर केला, तपस्वी त्यागी वृत्तीचा प्रगल्भ बुद्धिमत्ता असणाऱ्या युवकांचा आदर्श आजच्या युवा पिढीने त्यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी करत स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा घेणे गरजेचे आहे.
यावेळी युनुस शेख,सूर्यकांत कचरे, संतोष रोडे, सीमा काटकर, निलेश जगताप यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार नंदराज चंदनशिवे यांनी व्यक्त केले.