विजय शिंदे
वालचंदनगर ता.इंदापूर येथील वर्धमान विद्यालयातील सहावी मध्ये शिकत असलेल्या मयुरेश ज्ञानदेव मेटकरी या विद्यार्थ्याने क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत 2 तास 31 मिनिटे मकरासन करून इंटरनॅशनल योगा बुक ऑफ रेकॉर्ड केले आहे.
मयुरेश याने जिद्द व चिकाटीच्या जोरावर योगा क्षेत्रातील ‘ मकरासन ‘ या आसनात आंतरराष्ट्रीय सर्व रेकॉर्ड मोडीत काढत तब्बल 2 तास 31 मिनिटे हे आसन करून आपले नाव इंटरनॅशनल योगा बुक मध्ये नोंदवले आहे.रविवार दि.१२ रोजी वालचंदनगर येथील वर्धमान विद्यालयात राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मयुरेश याने हा विक्रम रचला आहे.यावेळी बोलताना मंत्री भरणे म्हणाले,मयुरेश याने अत्यंत कमी वयात केलेला हा विक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.येणाऱ्या काळात मयुरेशला शासनाच्या माध्यमातून शक्य तेवढी जास्तीची मदत करण्याचा आपण प्रयत्न करू. मयुरेशला त्याचे वडील ज्ञानदेव मेटकरी यांनी स्वतः प्रशिक्षण दिले आहे.
मेटकरी याचे या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत कुंभार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मकरंद वाघ,उपाध्यक्ष प्रशांत महामुनी,उपप्राचार्य रामनाथ नाकाडे,पर्यवेक्षक धनंजय उबाळे,शिवप्रसाद कुलकर्णी यांच्यासह परिसरातून कौतुक होत आहे.या उपक्रमामध्ये परीक्षक म्हणून दत्तात्रेय बिडकर (गॅझिटेड गव्हर्नमेंट ऑफिसर),रवींद्र वेदपाठक(योगाचार्य रेफरी), रणवरे ऐ.यु. (रेफरी),अरविंद देठे(क्रीडा शिक्षक), विजयसिंह पाटील(सीनियर शिक्षक),डॉ. प्रज्ञा लोंढे(वैद्यकीय अधिकारी),बिसीए चे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांनी काम पाहिले.