पुण्याकडील युवकावर इंदापूर जवळ गोळीबार; गोळीबारात युवकाचा मृत्यू.

विजय शिंदे

इंदापूर इंदापूर शहरालगत बाह्यवळण रस्त्यावर असलेल्या हॉटेल जगदंबा येथे आज सायंकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये एका युवकाचा सदर गोळीबारात मृत्यू झाला आहे. सदर घटनेने इंदापूर शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे.

सदर गोळीबार मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव अविनाश धनवे असल्याचे प्राथमिक माहिती असून तो पुण्याजवळील आळंदी परिसरातील राहणारा असल्याचे सांगितले जात आहे. सदरची घटना घडतात तात्काळ इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here