विजय शिंदे
आमदार दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशांनंतर कौठळी पोंदकूलवाडी इंदापूर शहर, कालठण नंबर 2 ते शिरसोडी रस्ता प्रजिमा 191 येथील शिरसोडी तालुका इंदापूर व कुगाव तालुका करमाळा यांना जोडणाऱ्या उजनी धरण बॅक वॉटरमध्ये लांब पुलाचे बांधकाम करण्यासाठी 395 कोटी 97 लक्ष 32 हजार अंदाजित खर्चाच्या बांधकामास राज्यसरकारकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून यामुळे इंदापूर व करमाळा तालुका आणि परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे.
इंदापूर व करमाळा तालुक्यातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन इंदापूर तालुक्यातील कौठळी पोंदकुलवाडी ते करमाळा तालुक्यातील कुगावला जोडणाऱ्या उजनी धरण बॅक वॉटरमध्ये पुलाचे बांधकाम, पोच मार्गाचे बांधकाम आणि इतर अनुषंगिक कामांबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार कार्यवाही तातडीने पूर्ण करुन या कामांना प्रशासकीय मान्यता राज्यसरकारकडून देण्यात आली असून त्याचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. राज्य सरकारने दिलेल्या प्रशासकीय मंजुरीमध्ये कौठळी पोंदकूलवाडी इंदापूर शहर, कालठण नंबर 2 ते शिरसोडी रस्ता प्रजिमा 191 येथील शिरसोडी तालुका इंदापूर व कुगाव तालुका करमाळा यांना जोडणाऱ्या उजनी धरण बॅक वॉटरमध्ये लांब पुलाचे बांधकाम या कामांचा समावेश आहे.
पुलामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र हा भाग जोडला जाणार आहे.पुणे व सोलापूर हे जिल्हे जोडले जावून दळणवळण अधिक गतिमान होणार आहे. सर्वात कमी वेळात झालेला हा निर्णय इंदापूर तालुक्याच्या प्रगतीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे. हा पूल व्हावा ही इंदापूरमधील सर्व व्यापा-यांची इच्छा होती. त्यामुळे शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत शहा व कार्यकारिणी सदस्य सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होते. खा. सुप्रिया सुळे यांनी देखील व्यापा-यांच्या मागणीला हिरवा कंदील दिला होता. आ. भरणे व अजित पवार यांच्या भेटीत ही त्यांनी ही मागणी मांडली होती. शहराच्या दळणळणाची गरज लक्षात घेवून अजित पवार यांनी मागील महिन्यात झालेल्या शेतकरी मेळाव्यात पुलाचे काम करण्याची जाहीर हमी दिली. त्यानुसार हालचाली होवून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व..
इंदापूर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये तालुक्याचा आमदार या नात्याने तालुक्याच्या विकासासाठी शिरसोडे ते कूगाव या पुलाची मागणी केली यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुलाच्या कामासाठी निधी देण्याचा शब्द दिला. आणि पंधरा दिवसात निधी मंजूर केला यामुळे अजित पवार म्हणजे दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व आहे.
आ.दत्तात्रय भरणे
आमदार इंदापूर,
निविदा जाहीर होतात इंदापुरात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले.