इंदापूर शहर शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीने मालोजीराजे व्याख्यान मालेचे आयोजन. 

विजय शिंदे 

इंदापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने इंदापूर शहर शिवजयंती उत्सव समिती २०२५ यांच्यावतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दिनांक १६ फेब्रुवारी ते मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी दररोज सायंकाळी सात वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत.

रविवार १६ फेब्रुवारी रोजी प्रशांत देशमुख हे जगणं सुंदर आहे या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. सोमवार १७ फेब्रुवारी रोजी व्याख्याते युवराज पाटील मुलांचे पालक बना मालक नको या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी पानिपतकार वक्ते विश्वास पाटील हे शिवरायांच्या जीवनातील अज्ञात व अपूर्व रोमहर्ष घटना या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत.

या व्याख्यानमालेसाठी इंदापूर शहर नेहरू चौक येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन इंदापूर शहर शिवजयंती उत्सव समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here