विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील शहा महादेवनगर ग्रामपंचायत व सतीश (गोटू )पांढरे मित्रपरिवार यांच्या वतीने महादेवनगर (शहा) येथे हळदी कुंकू समारंभ व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे क्रीडा युवक कल्याण व अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पत्नी सारिका (मामी) भरणे, शोभा (मामी) मधुकर भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती वैशाली पाटील, महिला अध्यक्ष साधनाताई केकाण,रेश्माताई हनुमंत कोकाटे, तेजस्विनी अमर भरणे, मुंबई पोलीस दलातील एपीआय सारिकाताई धायगुडे, डॉ रोहन हेगडे, निलोफरताई रजाक पठाण, ग्रामसेविका संजीवनी मराळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.
यावेळी गाणी, मजेशीर खेळ, उखाणे याचबरोबर स्वरांजली संगीत अकॅडमी इंदापूर यांचा गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून लावणी सम्राट उमेश शिंदे अकलूज यांच्या लावणीचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी उपस्थित सर्व महिलांना वाण म्हणून मोठे स्टीलचे ताट दिले जाणार असून विजेत्या स्पर्धकांना पैठणी सोबतच विविध बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे.
यावेळी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश (गोटू) पांढरे व सरपंच स्वातीताई संतोष पांढरे यांनी केले आहे. यावेळी उपसरपंच पूनम कडवळे , ग्रामपंचायतचे सदस्य सुनीता निकम, दुर्गा कुंभार, दिलीप पाटील, अनिता गंगावणे, जयश्री खबाले अण्णासाहेब निकम,प्रताप खबाले उपस्थित राहणार आहेत.