विडंबन गीतांच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या कलाकारांचा सन्मान…

विजय शिंदे 

महाराष्ट्र ही संतांची पावन पवित्र भूमी, ज्ञानेश्वर माऊलींचं नाव घेतलं की ज्ञानेश्वरी डोळ्यांसमोर येते. तुकोबांचं स्मरण झालं की गाथा पुढे उभी राहते, तर नाथांची आठवण काढली की त्यांची भारुडे समोर येतात.

संतांनी आयुष्यभर समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरांबाबत केलेलं विडंबन गीतांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यातून समाज प्रबोधन व्हावे यासाठी भाटनिमगाव सारख्या ग्रामीण भागातील महादेव खबाले हा कलाकार प्रयत्न करत आहे.

लगीन झाल्यावर पोरगं वेगळं राहिलं या गाण्यावर महादेव खबाले व माधवी हिवरे या कलाकारांनी समाज प्रबोधन पर कला सादर केली. त्यानिमित्ताने खबाले व हिवरे यांचा परिसरातील नागरिकांनी सन्मान केला आहे.

आज-काल विभक्त कुटुंब पद्धत समाजात मन हेलावणाऱ्या घडणाऱ्या घटना, नव्या ढंगात, नव्या रंगात, सामाजिक प्रश्नावर भाष्य करत या प्रश्नांची जाणीव समाजापुढे आणली.

यावेळी खबाले व हिवरे या कलाकारांचा अनिल धनाजी हेगडे,अश्विनी अनिल हेगडे, अमोल मिसाळ (सर) व सोनाली अमोल मिसाळ यांनी सत्कार केला, यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना कलाकार महादेव खबाले म्हणाले समाजात घडणाऱ्या घटना मन हेलावून टाकतात, त्यामुळेच या गीतातून समाज प्रबोधन व्हावे ह्या हेतूने कला सादर केली. यासाठी माधवी हिवरे,राजवली पठाण, आरती पवार,शंभुराज खबाले यांची साथ मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here