विजय शिंदे
इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचा मुलगा मल्हार याचा ७ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.इंदापूर येथील निवासी मतिमंद शाळा दत्तनगर येथे वाढदिवसाचे औचित्य साधून मुलांना अन्नदान करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी मतिमंद निवासी शाळेस मल्हार यांच्या वाढदिवसानिमित्त माईक सिस्टीम भेट दिला
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी सचिन खुडे म्हणाले की मल्हार यांचा ७ वा वाढदिवस निवासी मतिमंद शाळेत करण्याचा निश्चय आमच्या कुटुंबियांचा झाला वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून मतिमंद निवासी शाळेस भेटवस्तू व मुलांना अन्नदान केल्याचे समाधान वाटले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ इतरही कर्मचारी यांनी गट विकास अधिकारी सचिन खुडे व खुडे कुटुंबियांचे आभार मानले. यावेळी पंचायत समितीतील इतरही सहकारी उपस्थित होते.