विजय शिंदे
बारामती लोकसभा मतदारसंघाची महायुतीची समन्वय बैठक रविवारी (१७ मार्च) बारामती येथे होत आहे. शिरूर, बारामती, पुणे लोकसभा मतदारसंघांचे प्रमुख राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता, मोरोपंत नाट्यगृह, नवीन कचेरी रस्ता, समर्थ नगर, बारामती येथे आयोजित करण्यात आली आहे.
मात्र, या बैठकीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि अजितदादांच्या विरोधात दंड थोपटून बारामतीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा करणारे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे उपस्थित राहणार.? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.महायुतीमधील घटक पक्षांतील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या बैठकीसाठी भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, राष्ट्रवादीचे दौंड येथील माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे मित्र पक्षाचे तालुका अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शिरूर व बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचे नेते,पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असून माजी मंत्री व साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील तसेच माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे या कार्यक्रमात बैठकीसाठी उपस्थित राहणार .? त्यांची नाराजी दूर झाली आहे .? असा प्रश्न विचारला जात आहे.