विजय शिंदे
हळदी- कुंकू समारंभ हा फक्त एक धार्मिक कार्यक्रम नसून, तो महिलांच्या एकत्रीकरणाचा आणि सामाजिक संबंधांचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे मत शोभा(मामी) भरणेयांनी व्यक्त केले.
शहा- महादेवनगर ग्रामपंचायत व सतीश (गोटू) पांढरे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभ व होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी त्या उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना शोभा (मामी) भरणे म्हणाल्या अशा सामाजिक कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि त्या समाजात अधिक सक्रिय भाग घेऊ शकतील,या उद्देशाने आयोजकांनी हा कार्यक्रम राबवला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदापूर तालुका महिला अध्यक्ष साधनाताई केकाण,तेजस्विनी भरणे, रेश्मा कोकाटे, सरपंच स्वाती पांढरे, निलोफरताई पठाण उपस्थित होत्या.
यावेळी शहा महादेव नगर परिसरातील मोठ्या संख्येने कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या, यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला, यावेळी विविध मनोरंजन कार्यक्रम संपन्न झाले, होम मिनिस्टर या मनोरंजन कार्यक्रमातून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंदापूर पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहा (महादेवनगर) ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी व सतीश (गोटू) पांढरे मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.