इंदापूर इंदापूर तालुक्यात ५ हजार २८१ घरकुलांना मंजुरी.

विजय शिंदे 

इंदापूरचे लोकप्रतिनिधी व राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील गोरगरिबांच्या पक्क्या घराचे स्वप्न पंतप्रधान घरकुल योजने अंतर्गत साकार केले आहे. या अंतर्गत इंदापूर तालुक्यात ५ हजार २८१ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.

त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या पक्क्या घराचे स्वप्न पाहत असलेल्या गोरगरिबांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.

पुणे जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात यावर्षी ३८ हजार ८२७ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट शासनाने दिले होते. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ३२ हजार ११८ विक्रमी घरकुलांना मंजुरी दिली आहे. यात इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक ४ हजार ६०८ घरकुलांचा समावेश आहे. या वर्षात पहिल्या टप्प्यात १ हजार ८८ घरकुल मंजूर आहेत त्यापैकी ७४१ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केलेला आहे. तसेच पहिला व दुसरा टप्पा मिळून इंदापूर तालुक्यात ५ हजार २७५ घरकुलांना आज अखेर मंजूरी मिळालेली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन २०२४-२५ अंतर्गत इंदापूर तालुक्याला ५७२३ घरकुलांचे उद्दिष्ट आमदार भरणे यांच्या माध्यमातून मिळाले होते. त्यापैकी भरणे यांच्या माध्यमातून ५२८१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. तर आधार कार्ड व तांत्रिक अडचणी संदर्भातील ४४२ घरकुलांना मंजुरी देणे अजूनही प्रलंबित आहे त्यातील पहिल्या हप्त्यात ७४१ लाभार्थ्यांना अनुदानाचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. तर ४५४० लाभार्थ्यांना हप्ता वितरित करणे बाकी आहे.

तसेच फेज दोनच्या पहिल्या टप्प्यात १११५ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यापैकी १०८८ घर मंजुरी देण्यात आलेले आहे त्यापैकी ७४१ लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ४६०८ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आली होती. त्यापैकी ४१९३ घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. तर आधार व तांत्रिक अडचणीची संबंधित ४१५ घरकुलांना मंजुरी देणे प्रलंबित आहे.

तसेच इंदापूर तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांनी प्रस्तावासोबत प्रामुख्याने आधार कार्ड दिलेले नाही, अशा नागरिकांचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांच्या घरकुलांच्या मंजुऱ्या प्रलंबित आहेत. त्या प्रस्ताव सादर केलेल्या नागरिकांनी आधार कार्ड बँकेला संलग्न करावीत. स्वतःची जागा उपलब्ध असल्याची कागदपत्रे ग्रामपंचायत किवा पंचायत समितीमध्ये द्यावीत. त्यानंतर तालुक्यातील उर्वरित लाभार्थ्यांच्या घरकुलांना तात्काळ मंजुरी दिली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here