अडचणीच्या काळात बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांची कदर करणार : प्रवीण माने

विजय शिंदे : साधी राहणीमान व उच्च विचारसरणीचे बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे आहेत. त्यांना लोकसभेत सलग नऊ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला असुन यावर्षी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते महासंसदरत्न पुरस्कार मिळाला आहे अशा अभ्यासु सर्वसामान्य शेतकरीच्या प्रश्नाची जाण असणाऱ्या सर्वसामान्यना सहज उपलब्ध होणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे मा. सभापती प्रवीण माने यांनी डिकसळ ( ता.इंदापुर) येथे शनिवार ( ता.१६) रोजी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ गाव भेटी दरम्यान केले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सुखाच्या काळात सगळेच बरोबर असतात परंतु अडचणीच्या काळात बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांची कदर करून त्यांना योग्य सन्मान दिला जाणार असून कुठल्याही दबावाला बळी न पडता शरदचंद्रजी पवार यांचे हात मजबूत करण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी पूर्ण ताकतीने उभे राहावे. यावेळी तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे असे सांगितले. यावेळी जेष्ठ नेते अशोक घोगरे यांनी केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या ध्येय धोरणावर जोरदार हल्ला केला. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार इंदापूर तालुका अध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील, युवक तालुकाध्यक्ष अनिकेत निंबाळकर, शिवसेना उद्धव ठाकरे गट तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, बाळासाहेब कोकाटे,आदि. पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी चंद्रकांत हगारे,ह.भ.प. दिलीप पवार, सुभाष चव्हाण, मोहनराव काळे, देविदास गायकवाड, युवा नेते ऋषिकेश काळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास बळी पवार, तानाजी पवार, सुहास गायकवाड, निखिल पवार, भाऊसाहेब भादेकर, अवधूत गायकवाड,संजय भादेकर, सौरव पवार, स्वप्निल कदम, आदी तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक विजयकुमार गायकवाड यांनी केले तर आभार शितलकुमार हगारे यांनी मांनले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here