श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने शिवजयंती साजरी.

विजय शिंदे 

शिक्षणाचा ज्ञानाचा प्रसार करणारी यंदाची शिवजयंती ज्ञानवर्धक वैचारिक शिवजयंती ठरावी या उद्देशाने श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर येथे शिवजयंती निमित्त शंभर प्रश्नाची प्रश्नमंजूषा विद्यार्थी व पालक यांच्यासाठी आयोजित करण्यात आली होती, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वीं जयंती विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न झाली.

झोपलेली वृत्ती बाळगलेल्या शरीरात “शिवराय” ही संजीवनी तयार करणे म्हणजेच ‘शिवजयंती’ साजरी करणे आणि रोजच शिवविचारांनी ती साजरी करणे हेच आमचे कार्य, याचसाठी हा अट्टाहास !! असल्याचे मत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया घसे (आगरखेड) यांनी प्रास्ताविक भाषणात व्यक्त केले.

यावेळी मुख्याध्यापिका सुप्रिया घसे (आगरखेड) यांनी इतिहासातील विविध दाखले देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती दिली.

पुस्तक वाचन करून इतर प्रसार माध्यमांचा वापर करत पालक वर्गाने प्रश्नमंजुषा दोन दिवसात सोडून शाळेमध्ये जमा केल्या.सदर उपक्रमात प्रशालेतील साडेचारशे विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग घेतला.शिवजयंती निमित्ताने श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या सहशिक्षिका संतोषी बनकर यांनी शिवगर्जना करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

यावेळी किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवून किल्ल्यांविषयी माहिती देण्यात आली. यामध्ये शिवनेरी, राजगड ,प्रतापगड, सिंहगड, पुरंदर, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, कुलाबा, तोरणा, विजयदुर्ग इत्यादी किल्ल्यांचा समावेश करण्यात आला. शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचे देखावे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केले. पोवाड्यांचा, भाषणांचा समावेश करून शिवजयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमासाठी पालकांनी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली.

त्याचबरोबर शिक्षक मार्गदर्शन करत असताना सोनिया कदम यांनी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात असणारे दृढ नाते, छत्रपती शिवाजी महाराजांची जडणघडण मासाहेब जिजाऊ यांनी केली याची माहिती विविध उदाहरणे, विविध दाखले देऊन विद्यार्थ्यांना दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोषी बनकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संध्या जाधव यांनी केले. यावेळी नंदा बनसुडे मॅडम, आशा घोडके मॅडम, आशाबाई नाझरकर मॅडम, सोनाली कदम मॅडम, अर्चना जाडकर मॅडम,रेश्मा गारदी मॅडम, मनिषा कांबळे मॅडम, स्वाती मोरे मॅडम, सोनाली कासेगावकर मॅडम, अर्चना दीक्षित मॅडम, प्रियंका जाधव मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांनी ज्ञानवर्धक शिवजयंती चे कौतुक केले व सर्वांना शिवजन्मोत्सावाच्या शुभेच्छा दिल्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here