विजय शिंदे
तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात केल्यास तसेच तरुणांनी व्यसनाधीन न होता अभ्यासावरती लक्ष केंद्रित केले तर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती दिनी अभिवादन ठरेल, असे मत भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे यांनी व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यातील रूई येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिर संपन्न यावेळी ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील सुप्रसिद्ध एच. व्ही.देसाई, नेत्र रुग्णालय, महंमदवाडी, हडपसर पुणे या हॉस्पिटलचे मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व गरजू व्यक्तींना अल्प दरात चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन रूई गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पार पडले. शिबिरामध्ये नेत्र तपासणी करता १२५ लोकांनी नोंदणी केली असून मोतीबिंदू शिबिरामध्ये २५ लोकांचे ऑपरेशन करण्याचे ठरलेले असल्याचे देसाई नेत्र रुग्णालयाचे अजित थोरात व नेत्रचिकित्सक रेश्मा घोडके यांनी सांगितले.
यावेळी भाजपा पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे यांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आत्ताच्या तरुण पिढीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल केली पाहिजे असे आवाहन केले.
ओबीसी मोर्चाचे सचिव आबासाहेब थोरात, रुई गावचे सरपंच अमरसिंह पाटील, तानाजीराव मारकड, प्रवीणकुमार शहा, दिपक साळुंखे, अविनाश मोहिते, अंकुश लावंड, किरण काळे, राजू पाळेकर, अमोल भुजबळ,सदाशिव मोहिते, प्रवीण साळुंखे, कांतीलाल लावंड, संदीप लावंड, माऊली लावंड, संदिपान लावंड, मगन मराडे, संतोष पांढरमिसे, रुई प्राथमिक आरोग्य केंद्रातील दिपाली मोहिते, शिल्पा लावंड, मंदा मारकड, रतन लवटे, लाला मराडे, आजिनाथ कणसे, शंकर कांबळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी मारकड व आभार प्रदर्शन प्रवीणकुमार शहा यांनी केले.