विजय शिंदे
ग्रामविकास विभागाच्यावतीने जिल्ह्यातील १ जानेवारी २०२४ ते ४ मार्च २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या बिगर अनुसूचित क्षेत्रातील एकूण १०८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाकरीता एकूण आरक्षण निश्चित करण्यात आले आहेत.
या आरक्षण सोडतीद्वारे ग्रामपंचायतनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता बहुउद्देशिय सभागृह, पाचवा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे सोडत काढण्यात येणार आहे.
यादिवशी इच्छूक पदाधिकारी, नागरिकांनी हजर राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.
यावेळी इंदापूर तालुक्यातील वीस ग्रामपंचायत साठी आरक्षण सोडत होणार आहे.
उद्धट, कालठण १, खोरोची, कांदलगाव, आगोती १, वडापुरी, तरडगाव, बोराटवाडी, कालठण २, आगोती २, पवारवाडी, गोखळी , पंधारवाडी, लुुमेवाडी, शिरसट वाडी, अवसरी, भाटनिमगाव, निरनिम गाव, शेटफळ हवेली, सुरवड या ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे.